
शिंदेंच्यां ” ऑपरेशन टायगरला” ठाकरेंचं “मिशन कोकण” टक्कर देणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राज्यात ‘ऑपरेशन टायगर ‘सुरू केल आहे.. या ऑपरेशन अंतर्गत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक आमदार त्यांच्याकडून गळाला लावलें जात आहेत..विशेष म्हणजे कोकणातील नेत्यांना सोबत घेण्यासाठी शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे.. मात्र आता शिंदेंचं ऑपरेशन टायगर थोपवण्यासाठी ठाकरे गटांन” मिशन कोकण “चा मेगा प्लॅन आखला आहे… ठाकरे गटाला लागलेली गळती थांबवण्यासाठी आणिकार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांची कोकणातील राजापूर येथे बैठक होणार आहे..
या बैठकीतून शिंदे सेनेला मोठा शह दिला जाणार आहे.. आता ठाकरेंच मिशन कोकण ऑपरेशन टायगर ला टक्कर देणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.आगामी मनपा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे यांची शिवसेना जोमाने तयारीला लागली आहे.. ठाकरे गटाच्या अनेक पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलं..कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.. त्यातच शिंदे गटाने ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनाही आपल्या सोबत येण्याचे निमंत्रण दिलं.. त्यामुळे येत्या काळात ठाकरे गटाला आणखी काही धक्के बसण्याची शक्यता वर्तवली जात असताना ठाकरे गट ॲक्शन मोडवर आला आहे..
यासाठी राजापूर येथे ठाकरे गटाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे..ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राजापूर येथे होणाऱ्या बैठकीबाबत बोलताना असे सांगितले की, शिवसेनेचे प्रमुख नेते एकत्र कोकणात जाणार आहेत.. मी एकटा जात नाही.. दरम्यान शिंदे सेनेचा कसल ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणूनऑपरेशन टायगर आहे मात्र उद्या सत्ता नसेल तर त्यांचा हक्क दुकान खाली होईल असा हल्लाबोल संजय राऊत यांनी चढवला..