
राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे- केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी
राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे. विकास हाच खरा हेतू असायला हवा. गरीबांचे अश्रू पुसणे, शेतकरी आणि शेतमजुरांचे कल्याण करणे, गावात चांगल्या शाळा आणि उत्तम रस्ते उपलब्ध करून देणे, शुद्ध पाणी मिळवून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट हवे. जाती, धर्म, भाषा याच्या पलिकडे विचार करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून आप्पासाहेब गोगटे यांनी काम केले आप्पासाहेबांसारखे दैव दुर्लभ नेतृत्व अभावानेच जन्माला येते अशा शब्दात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देवगडचे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांचा गौरव केला.आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अध्यक्षतेखाली सोमवारी झाला.
यावेळी महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे उपस्थित होते.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, प्रकाश गोगटे, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, राष्ट्रीय वकील संघटनेचे अध्यक्ष एडवोकेट संग्राम देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, स्नेहलता देशपांडे, काका ओगले, अश्विनी भावे शामकांत काणेकर, नकुल पारसेकर, संदीप साटम, बाळ खडपे, सुधीर जोशी, सदा ओगले, वैभव बिडये यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.