
जी.बी.एस. व अन्य साथरोगचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाण्याचे निर्जंतुकीकरण करून पाणी पुरवठा करावा.
राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम (जी.बी.एस.) विषाणूचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची, वितरण बिंदूच्या (शाळा, अंगणवाडी, घरे इत्यादी) पाणी नमुन्यांची गावातील प्रशिक्षित महिला, स्वयंसेवकामार्फत प्रत्येक महिन्यातून एकदा जैविक व रासायनिक तपासणी करण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. किर्तीकिरण पुजार यांनी केले.
जी.बी.एस. विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणीपुरवठा होण्याच्या अनुषंगाने गाव पातळीवर नळ पाणीपुरवठा योजनांचे स्रोत शाळा, अंगणवाडी व नळाद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारे पाणी यांच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुने अभियान स्वरूपामध्ये गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करावे. जी.बी.एस.चा व अन्य साथरोगचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेत जैविक तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत