
एचएसआरपी बसविण्यासाठी मुदतवाढ; २५ लाख वाहनांना ही नंबर प्लेट बसवावे लागणार.
हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत होती. मात्र, वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी बसविण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे वाहनांनी आता ३० एप्रिल २०२५ पूर्वी एचएसआरपी बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
राज्यात २०२९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्यासाठी एका कंपनीला काम देण्यात आले असून ही नंबरप्लेट बसविण्यास सुरुवात झाली आहे.