
आरोसबाग येथे 1 लाखाचे मद्य जप्त; सावंतवाडीतील दोघे ताब्यात.
गोवा राज्यातून सिंधुदुर्ग मार्गे छुप्या पद्धतीने गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 1 लाख 14 हजार 240 रुपये किमतीच्या दारूसह 3 लाखाची गाडी असा एकूण 4 लाख 14 हजार 240 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी गणेश लक्ष्मण चव्हाण (35) व सिसिल जॉन फेराव (55, दोघे रा. सबनीसवाडा-सावंतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई रविवारी पहाटे तेरेखोल नदी पुलावर, आरोसबाग येथे राज्य उत्पादन शुल्कच्या इन्सुली तपासणी नाका पथकाकडून करण्यात आली.