रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य कौतुकास्पद -ना. सामंत सदिच्छा भेटीत प्रतिपादन, बँकेच्यावतीने सन्मान

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी बँकेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रत्नागिरी जिल्हा बँकेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार ना. सामंत यांनी काढले.यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव, बँकेच सर्व संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अदिकारी अजय चव्हाण, व बँकेचे अधिकारी/ कर्मचारी वृंद उपस्थित होते. प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव यांनी केले. यावेळी ना. सामंत म्हणाले रत्नागिरी जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पद असून डॉ. चोरगे सरांनी बँक शुन्यातून उभी केली, त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने भरारी घेतली आहे.

रत्नागिरी जिल्हा बँक भारतातीलच नव्हे तर जगातील ३०% लाभांश देणारी सहकारातील एकमेव बँक आहे. अशा या नेतृत्वाला म्हणजे डॉ. चोरगे सरांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेला माझघ आतापर्यंत नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे आणि यापुढेही सर बँकेत जो काही निर्णय घेतील त्याला माझा पूर्ण पाठिंबा राहील.ना. सामंत पुढे म्हणाले, आतापर्यंत सरांनी ज्या ज्या वेळी निवडणुकीसाठी पॅनल केले. त्या त्या वेळी मी सरांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिलो व यापुढे सुद्धा सदैव मी सरांच्या पाठिशी ठामपणे उभा राहीन, याची मी आज ग्वाही देतो. मला डॉ. चोरगे सरांचा आदर आहे.

सरांच्या बद्दल विश्‍वास आहे आणि त्या विश्‍वासामुळेच आजही तुमची आमची बँक उभी आहे. त्याचे सर्व श्रेय बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे सर यांची शिस्त व त्यास बँकेचे सर्व संचालक व कर्मचारी यांनी दिलेली साथ यामुळेच हे शक्य झाले, असे गौरवोदगार नामदार डॉ. उदय सामंत यांनी डॉ. सरांच्या बँकेच्या बाबतीत काढले.आज रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेचे नाव महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये घेतले जाते. शासनाचे परिपत्रकानुसार राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या १५ जिल्हा बँकांमध्ये शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन तसेच वेतनधारक यांची खाती जिल्हा बँकेत उघडण्याबाबत निर्णय झालेला असून सदर १५ जिल्हा बँकांमध्ये आपल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश आहे. याचा मला रास्त अभिमान वाटतो. जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचार्‍यांची व पेन्शनधारकांची खाती बँकेत उघडण्यासंदर्भात संबंधित शासकीय खात्याचे अधिकारी यांना आदेश देणेबाबत मी जिल्हाधिकारी यांना तत्काळ सूचना करणार आहे.

बँकेचे मख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जास्तीत जास्त योग्य कर्जप्रकरणे करून, होतकरू तरूणांना कर्ज देवून, या कर्जयोजनांचा लाभ द्यावा, बँकेकडून शासनाच्या विविध कर्जयोजना राबवाव्यात असे बी बँकेच अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांना आवाहन करून आपली जिल्हा बँक संपूर्ण महाराष्ट्रात एक रोल मॉडेल म्हणून काम करेल. यापुढेही डॉ. तानाजीराव चोरगे यांचे अध्यक्षतेखाली बँकेची दैदिप्यमान वाटचाल सुरू राहील. याबाबत माझ्या मनात यत्किंचतही शंका नसून, बँकेला मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून मी सदैव बँकेच्या पाठिशी उभा राहीन, अशी ग्वाही देतो, असे प्रतिपादन ना. सामंत यांनी केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button