
पर्सनेट मच्छिमारीला रविवार दि. १ सप्टेंबर पासून सुरुवात.
रत्नागिरी:- कोकणात किनारपट्टीवर गेल्या तीन महिन्यांपासून मच्छिमारी बंदी लागू असल्याने पर्सनेट मच्छिमारीला रविवार दि. १ सप्टेंबर पासून सुरुवात झाली. मासेमारीला दि. १ ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात होते.मात्र पर्सनेट, फिशिंग ट्रॉलर यांना मासेमारीसाठी दि.१ सप्टेंबरची वाट पाहावी लागते. ती प्रतिक्षा आता संपली असून रविवारपासून मोठ्या नौका समुद्रावर स्वार झाल्या आहेत. मात्र खराब वातावरणामुळे केवळ ५० टक्केच नौका समुद्रात झेपावल्या आहेत.मागील महिन्याभरात समुद्राला आलेले उधाण, त्यात समुद्रामध्ये येणार्या अजस्त्र लाटा आणि त्याच्या जोडीला वारा अशा प्रतिकूल स्थितीचा सामना नव्या हंगामाच्या सुरुवातीला मच्छीमारांना करावा लागला. या स्थितीमध्ये रविवारपासून पर्ससीन नेटद्वारे सुरु होणार्या मासेमारीच्या नव्या हंगामाला सामोरे जावे लागणार आहे.मासेमारासाठी सद्य:स्थितीमध्ये प्रतिकूल वातावरण आहे. समुद्रातील पाण्यालाही चांगलाच करंट आहे. या सार्या प्रतिकूल स्थितीचा अंदाज घेऊन पर्ससीन नेटद्वारे मासेमारी करण्यासाठी मच्छीमार बांधव सज्ज झाला आहे.शासकीय नियमानुसार दि. १ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरु झाला आहे