
रत्नागिरीतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक थिबा पॅलेसमध्ये मल्टिमिडिया शोची यंत्रणा सज्ज, पर्यटनात वाढ होणार
रत्नागिरीतील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक थिबा पॅलेसमध्ये मल्टिमिडिया शोचे राज्यातील पहिले नवे दालन नागरिक, पर्यटकांसाठी लवकरच खुले होणार आहे. रमणीय गार्डन आणि मल्टीमिडिया शो या अनुषंगाने आवश्यक असलेली यंत्रणा त्याठिकाणी बसविण्यात आली असून शिल्लक राहिलेल्या तांत्रिक बाबी आणि उर्वरित कामांची पूर्तता होवून या दालनाचा शुभारंभ होणार आहे.थिबापॅलेस हे ऐतिहासिक ठिकाण आहे. या इमारतीला हजारो पर्यटक भेट देवून तेथील म्युझियमचा आनंद घेतात. पण आता थिबापॅलेस या नव्या शोमुळे चर्चेत येणार आहे.
सुमारे ३५० आसन व्यवस्था असलेले हे दालन निर्माण करण्यात आले आहे. येथे आता रमणीय गार्डनची निर्मितीही रण्यात आली आहे. यातून थिबापॅलेसलाही आकर्षक साज चढणार आहे. थिबा पॅलेसच्या प्रांगणात मल्टीमिडिया शोचे हे दालन सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे हे काम मार्गी लागत आहे. येथील सुमारे अडीच एकर जागते हे बांधकाम उभारण्यात येत आहे.थिबा पॅलेसमध्ये मल्टिमिडिया शोचे राज्यातील पहिले नवे दालन नागरिक पर्यटकांसाठी लवकरच खुले होणार आहे. पॅलेसच्या इमारतीसमोरील रिकाम्या जागेत मल्टिमिडिया शोचे सादरीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पाला पुरातन विभागाने तत्वतः मान्यता दिली आहे. या प्रकल्पात थिबा पॅलेसचा दर्शनी भाग हा पडदा म्हणून वापरण्यात येणार आहे.
मल्टिमिडिया शोमध्ये सात भारतरत्नांचा इतिहास, थिबापॅलेस, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास दाखविण्यात येणार आहे. अंदमानमध्ये अशा पद्धतीने मल्टिमिडिया शोचे सादरीकरण केले जाते. नागपुरातील फुटाळा येथे नागपूरचा इतिहास दाखवण्यात येतो. या धर्तीवर रत्नागिरीत या जागेवरती काळोखात अर्ध्या तासाचा हा लेझर शो सादर केला जाईल. रत्नागिरी शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे नवनवीन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार उदय सामंत यांनी लक्ष वेधलेले आहे. यामुळे रत्नागिरी शहराची स्मार्टसिटीच्यादृष्टीने घोडदौड सुरू आहे.www.konkantoday.com