![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2025/02/download-3-8.jpeg)
दिल्लीच्या चेंगराचेंगरीच्या घटनेत दगावलेल्या प्रवाशांचा आकडा खोटा…., संजय राऊत.
मुंबई१६:- महाकुंभमेळ्यात जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना शनिवारी (दि. १५ फेब्रुवारी) रात्री घडली. या घटनेत १८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला …… या घटनेनंतर काँग्रेसने रेल्वेच्या निष्क्रिय कारभारावर टीका केली आहे. सरकारच्या बेजबाबदार वृत्तीमुळे अशा घटना घडत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.
आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, दिल्लीतील रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत किती लोक मृत्यूमुखी पडले याचा सरकारने दिलेला आकडा खोटा आहे. माझ्या माहितीप्रमाणे किमान १२० ते १५० लोक चेंगराचेंगरीत मरण पावले आहेत. सरकार आकडा लपवत आहे. महाकुंभला जाण्यासाठी भाजपाकडून निमंत्रण दिले जात आहे. जणू काही हा भाजपाचा सोहळा आहे. लोकांना असे भ्रमित केले जात आहे की, तुम्ही फक्त या. तुमच्यासाठी गाड्या, जेवण-राहण्याची व्यवस्था सर्व काही केले आहे. पण तसे काही नाही. इतकी व्यवस्था याआधी कोणत्याच कुंभमेळ्यात झाली नव्हती.