
जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षकांचे अस्तित्व पुन्हा धोक्यात.
राज्य शासनाने १० फेब्रुवारी २०२५ रोजी कंत्राटी शिक्षक भरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील शाळांमध्ये नुकतेच हजर झालेले डी.एड., बी.एड. धारक वार्यावर येण्याची शक्यता आहे. या निर्णयाविरोधात आता डी.एड., बी.एड. शिक्षक आक्रमक झाले असुन त्यांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.रत्नागिरी जिल्हा हा दुर्गम डोंगराळ भागात वसलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शाळा अतिशय डोंगर कपारीत आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीच्या सोयीदेखील नाहीत.
गावात रोजगार नसल्याने अनेक कुटुंब शहराकडे स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांचा पट कमी झाला आहे. जिल्ह्यात ५०० हून अधिक शाळा दहापेक्षा कमी पट असलेल्या आहेत. अनेक शाळा पोर्टल शिक्षक भरती होवूनही शून्य शिक्षकी आहेत. पवित्र पोर्टल हे कोकणासाठी कायम अपवित्र झाले आहे. एका विशिष्ठ जिल्ह्यातील पवित्र पोर्टला जास्त शिक्षक भरती होतात, तर एका भागातील फार कमी शिक्षक भरती होतात, हा संशोधनाचा विषय बनला आहे.www.konkantoday.com