
चिकन खाल्ल्यामुळे GBSचा धोका, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
जीबीएस आजारामुळे नागपूरमध्ये ४५ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झालाय. पुणे, मुंबईनंतर जीबीएसने नागपूरातही थैमान घातलेय. जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या राज्यातील एकूण रूग्णाची संख्या आता ९वर पोहचली आहे.मुंबई, पुणे, सोलापूरनंतर नागपूरमध्येही जीबीएसने बळी घेतलाय. नागपूरमध्ये दोन रूग्णावर उपचार सुरू आहेत, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय. याचदरम्यान, धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. चिकन खाल्ल्यामुळे जीबीएसचा धोका असल्याची माहिती, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.कमी शिजवलेल्या मांसामधून जीबीएस आजाराचा धोका आहे. पोल्ट्री फॉर्ममधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये हे उघड झाल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती मला खडकवासल्याच्या नागरिकांनी दिली असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.