मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा


गुहागर तालुक्यातील जानवळे गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेत) उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा ४१ वा जन्मदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

जानवळकर यांच्यासह सर्व मनसे कार्यकर्त्यांनी जानवळे जि. प.शाळा नं. १ या ठिकाणी सुपारी झाडांचे वृक्षारोपण केले. त्याचबरोबर गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. गुहागर तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांकडून मनसेच्या शृंगारतळी संपर्क कार्यालयात केक कापून जन्मदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी मनसेचे गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, गुहागर शहर अध्यक्ष अभिजीत रायकर, गुहागर तालुका सचिव प्रशांत साटले, जानवळे गावचे समाजसेवक संतोष मस्कर जानवळे शाखाध्यक्ष सुशांत कोळंबेकर, विजय शिंदे, कोंढर काळसूर शाखाध्यक्ष सुनील मुकनाक, ज्येष्ठ मनसैनिक रमेश जोशी, उपतालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, गुहागर तालुक्यातील नामवंत उद्योजक विनोद पवार, जेष्ठ पत्रकार सत्यवान घाडे आदी उपस्थित होते.

दिवसभरात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती यामध्ये गुहागर तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष दिनेश चव्हाण, सचिव गणेश किर्वे, पाटपन्हाळे गावचे उपसरपंच आसीम साल्हे, शृंगारतळीतील सामाजिक कार्यकर्ते उस्मान भाई, अहमद भाई, वडद गावचे सरपंच संदीप धनावडे, मुंढरचे सरपंच बबलू आग्रे अशा अनेक नामवंत व्यक्तींनी भेट देऊन तसेच राजकीय व सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून श्री जानवळकर यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button