
रत्नागिरी बाजारपेठेत सामान्यांना न परवडणारा हापूस दाखल
यावर्षी बदलत्या हवामानात हापूस आंबा उशिराने हाती यत असून बाजारपेठेतही महागड्या दराने विकला जात आहे. अद्याप स्थानिक आंबा बाजारात येत नसल्याने देवगडचा हापूस आंबा ग्राहकांसाठी उपलब्ध करून द्यावा लागत आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. सध्या प्रती डझन दर २ ते ३ हजार असा आहे.दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये थोड्या प्रमाणात रत्नागिरी परिसरातील हापूस आंबा तयार होवून तोडा जात असे. मागणीप्रमाणे तो स्थानिक बाजारात उपलब्ध होत असे. बाकीचा आंबा मुंबई बाजारात पाठवला जात असे. यावर्षी फेब्रुवारी महिना निम्मा संपला तरी स्थानिक आंबा तयार होत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.www.konkantoday.com