
रत्नागिरीच्या डॉ. सीमा कांबळे यांची थायलंडमध्ये व्याख्याता म्हणून नियुक्ती.
रत्नागिरी शहरानजिकच्या पानवल येथील डॉ. सीमा मेढे-कांबळे यांची थायलंडमधील महिदोल विद्यापीठाच्या आसियान इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ डेव्हलपमेंट या आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये व्याख्याता म्हणून नियुक्ती मिळवली आहे. हे विद्यापीठ आरोग्य विकास, सार्वजनिक आरोग्य, आणि संबंधित क्षेत्रांमध्ये संशोधन आणि शिक्षणासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे.
डॉ. सीमा यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून गृहविज्ञान विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, थायलंड येथून अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात उच्च शिक्षण, पीएचडी संपादन केली. डॉ. सीमा यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिक/जर्नल्समध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भाग घेवून शोधनिबंध सादर केलेत.www.konkantoday.com