
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयागराज येथे सहकुटुंब महाकुंभात स्नान केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयागराज येथे सहकुटुंब महाकुंभात स्नान केले. त्यांच्या पत्नी अमृता आणि मुलगी दीविजा यावेळी उपस्थित होत्या.कुंभस्नान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सहकुटुंब महाकुंभात येण्याचे भाग्य लाभले, याचा मला अतिशय आनंद आहे. यावर्षी 144 वर्षांनी विशिष्ट योग आला आहे. त्या पर्वावर मला संगमावर स्नान करण्याचे भाग्य लाभले.
उत्तरप्रदेश सरकारने अतिशय सुंदर व्यवस्था केली आहे. एक नवा विक्रम आणि नवा इतिहास येथे घडला आहे. 50 कोटी भाविकांनी आतापर्यंत येथे उपस्थिती लावली आहे. भारताची आस्था पाहून संपूर्ण जग आज आश्चर्यचकित आहे. हीच आपली दिव्यता, हीच आपली भव्यता, हाच आपला कुंभ आहे. हेच आमचे संस्कार आहेत, हीच आमची संस्कृती आहे. 2027 च्या नाशिक महाकुंभाची तयारी आम्ही सुरु केली आहे.