
मधुरांगण फाऊंडेशनतर्फे कैलास नागचाफा रोप निशुल्क वितरित.
कोकणातील दुर्मिळ आणि बहुगुणी औषधी वनस्पती म्हणजे कैलास नागचाफा याचे अनेकविध आजारांवर उपाय म्हणून उपयोग केला जातो. कैलास नागचाफा आणि त्याचे महत्व रत्नागिरीतील गावांमध्ये व उज्जैन, परळी वैजनाथ, मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, हैदराबाद, विविध वेदपाठ शाळा अशा देशाच्या कानाकोपर्यात पोहोचले आहे. कारण आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक ४ राज्यातील विविध भागातून आलेले वेदपाठ शाळेतील अध्यापक, मंदिर पूजारी, वैदिक क्षेत्रातील आलेल्या ५१ अभ्यासकांनी त्या नागचाफा रोपांची लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे.
महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन व कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने क्षेत्रीय वैदिक संमेलन नुकतेच साजरे झाले. संमेलनाच्या सांगता समारंभावेळी संगमेश्वर येथील मधुरांगण फाऊंडेशनतर्फे कैलास नागचाफा रोप निशुल्क वितरित करण्यात आले.www.konkantoday.com