
दख्खनचा राजा जोतिबाच्या खेट्यांना उद्यापासून प्रारंभ
दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाचे खेटे उद्यापासून (दि. १६) पासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शन रांगेचे नियोजन केले आहे.भाविकांच्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले आहे.
माघ महिन्यात पाच रविवारी यात्रा भरते, त्या यात्रेस जोतिबाचे खेटे असे म्हणतात. यंदा खेट्यांचे ४ रविवार आले आहेत. या खेट्याचं वैशिष्ट्य असे आहे की, कोल्हापूरचे भाविक न चुकता दरवर्षी हे खेटे घालतात. आता कोल्हापूरसह सांगली, साताराचे सुद्धा भाविक मोठ्या संख्येने खेटे घालायला येत असतात.