पगाराची विचारणा केली म्हणून लॉकडाऊनमधेच कर्मचार्‍यांना तडकाफडकी कामावरून काढले

रत्नागिरीत मागील दोन वर्षा पासून रत्नागिरीत महाराष्ट्र विद्युत वितरण क.मर्या. रत्नागिरी उपविभाग शहर शाखा क्र ३ कार्यालयामध्ये विक्रम नरेंद्र चौघुले आणि शहर शाखा क्र ५, देवेंद्र शशिकांत राऊत हे दोघे आऊटसोर्स या पदावर कार्यरत होते.
मागील दोन वर्ष त्यांनी दिवस रात्री त्यांचे कर्तव्य चोख पार पाडले. मागील दोन वर्षात त्यांच्या विरोधात एकही तक्रार नोंदवली गेली नाही. गरज भासल्यास अहोरात्र निसंकोच सेवा देत होते. कोविड १९ महामारी (लॉकडाऊन) च्या काळात २४ तास कोणत्याही मोबल्याची अपेक्षा न बाळगता अत्यावश्यक सेवा बजावत होते.
मार्च २०२० ला महाराष्ट्र विद्युत वितरण क.मर्या.रत्नागिरी मध्ये कोल्हापूर विद्युत अँपरांटीस यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले त्यामुळे सर्व कामगारांच्या बँकेच्या खात्याची पूर्ण माहिती नव्याने देऊन सुद्धा एप्रिल महिन्याचा पगार खात्यात जमा झाला नसल्यामुळे विक्रम नरेंद्र चौघुले आणि देवेंद्र शशिकांत राऊत यांनी संस्थेचे तांबोळी यांना दूरध्वनी वरून विचारणा केली असता त्यांनी असे सांगितले की अकाउंट डिपार्टमेंटमधून चुकी झाली आहे. त्यांच्या चुकीमुळे तुमच्या दोघांचे पगार दुसरीकडे गेले आहेत. त्यामुळे तुम्हाला या महिन्याचा पगार उशिरा मिळेल. तेव्हा देवेंद्र राऊत यांनी तांबोळी यांना विचारलं उशिरा म्हणजे किती दिवसाने होईल एवढे विचारले असताना तांबोळी यांना विचारणा केल्याबद्दल राग आला. त्वरित काम सोडून जा त्यांनी दिनांक २०.५.२०२० ला उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र विद्युत वितरण क.मर्या. रत्नागिरी शहर उपविभाग यांच्या नावे पत्र पाठवले की विक्रम नरेंद चौघुले आणि देवेंद्र शशिकांत राऊत यांना कामावर हजर न ठेवण्याबाबत या पत्रात असे कारण दिले आहे की विक्रम नरेंद चौघुले आणि देवेंद्र शशिकांत राऊत या दोघांनी संस्था संचालक आणि आणि संस्था सचिव यांच्याशी दूरध्वनी वरून उद्धट भाषेत वर्तन केल्याने यांना कामावरून कमी करण्यात येत आहे. वास्तविक पगार कधी मिळणार हे विचारणे म्हणजे उद्धट वर्तन होवू शकत नाही, असे कामावरून कमी केलेल्या कामगारांचे म्हणणे आहे. पगाराची विचारणा ही काही कामगाराची चूक नाही. उलट संस्थेच्या अकाऊंट डिपार्टमेंटने चुकी केली. आणि शिक्षा मात्र कामगारांना मिळाली. ही लोकशाही नसून एकप्रकारची हुकूमशाहीच आहे असे या कामगारांचे मत आहे. कोल्हापूर विद्युत अँपरांटीसचे संस्था संचालक आणि संस्था सचिव यांनी या लॉकडाऊनच्या काळात एखाद्या कामगारांना क्षुल्लक आशा कारणारवरून तडकाफडकी कामावरून काढणे हे कितपत याेग्य आहे. हातातील नोकरी घालवून बेरोजगारी वाढवणे कितपत येग्य आहे. विक्रम नरेंद चौघुले आणि देवेंद्र शशिकांत राऊत यांच्या कुटूंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे याला जवाबदार फक्त कोल्हापूर विद्युत अँपरांटीसचे संस्था संचालक आणि संस्था सचिव असल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे संस्थेच्या या भूमिकेवर कामगार वर्ग नाराजी व्यक्त करत आहे. तसेच रत्नागिरीतील भूमीपुत्रांवर झालेल्या अन्यायाची दखल लोकप्रतिनिधींनी घ्यावी अशी मागणी होत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button