
कोकण रेल्वेच्या करमाळी स्पेशल या गाडीतून प्रवास करण्याऱ्या महिलेची बॅग चोरून साठ हजार चा ऐवज लंपास
कोकण रेल्वेच्या करमाळी स्पेशल या गाडीतून प्रवास करण्याऱ्या महिलेची बॅग अज्ञात चोरट्याने पळविली. त्यामध्ये एकूण ६० हजाराचा मुद्देमाल होता. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० डिसेंबर २०२४ ला सकाळी पावणे आठच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला या रेल्वेच्या करमाळी विंटर स्पेशल या गाडीतून ठाणे ते गोवा अशा प्रवास करत असताना त्यांच्याकडील बॅग अज्ञात चोरट्याने पळविली. त्यामध्ये ३५ हजार, ७ हजाराचा मोबाईल, १८ हजार रोख रक्कम व पर्स आणि इतर साहित्य असा ६० हजाराचा मुद्देमाल होता