
कळवंडेत कोळसा भट्ट्या लावणारे मोकाट
चिपळूण मधील टेरवमधील कोळसा भट्ट्यांना लगाम लावणार्या वन विभागाने गेले दोन दिवस कळवंडे येथे मोठी कारवाई झाली. या गावातील तब्बल १२ कोळसा भट्ट्या उध्वस्त करीत लाकूडसाठाही जप्त केला. या ठिकाणी राजरोसपणे कोळसा भट्ट्या लावणारे यामुळे मोकाट असून वन विभागाने या प्रकरणाच्या मूळाशी जावे, अशी मागणी केली जात आहे.तालुक्यातील टेरव येथे वनविभागाने सातत्याने कोळसा भट्ट्यांवर कारवाई केल्या आहेत. सततच्या कारवायांमुळे येथे कोळसा भट्यांना काहीसा लगाम बसला. दरम्यान कळवंडे येथे कोळसा भट्ट्या धगधगत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या अधिकार्यांनी कळवंडे माडवाडी येथील डोंगरात १२ कोळसा भट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. मात्र या कारवाईत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
भट्ट्या लावणार्या व्यावसायिकाचा वनविभागाच्या अधिकार्यांकडून शोध घेतला जात आहे. दोन जागेत १२ कोळसा भट्ट्या धगधगत होत्या. त्यासाठी तितक्याच पटीने लाकडाचा वापर केला गेला. भट्ट्या कोणाच्या जागेत लावण्यात आल्या. त्या कोणी लावल्या, लाकूड कोठून आणले, कोणाचे जंगल तोडले, जंगल तोडण्यास परवानगी होती का, असे अनेक प्रश्न या कारवाईनंतर निर्माण झाले आहे.www.konkantoday.com