
*रत्नागिरी जिल्ह्यात भाजप व शिंदे शिवसेनेत बॅनर युद्ध, एकमेकांना इशारा,बाप बाप होता है.. झुंड मे तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है’, पाली गावात बॅनर झळकले
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी निवडणूक जिंकली असली तरी महाराष्ट्रात महायुतीला चांगलाच पराभव स्वीकाराला लागला त्यानंतर पुढील काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती मजबुतीने काम करील असे वाटत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र भाजपा व शिंदे शिवसेनेत वाद रंगू लागले आहेत लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांच्या विजयानंतर राणे यांच्या मुलांकडून सामंत बंधूंवर आरोप करण्यात आले होते त्यामुळे नाराजी निर्माण झाली असतानाच आता जिल्ह्यात बॅनर युद्ध रंगले आहे कणकवलीत सामंत बंधूंचे फोटो असलेले बॅनर लागल्यानंतर आता .उदय सामंत यांच्या पाली गावात भाजपचे बॅनर लागल्यामुळे मोठी चर्चा रंगली आहे.’बाप बाप होता है..,’ अशा आशयाचं उदय सामंतांच्या गावात नारायण राणेंचे पोस्टर लागले आहे. ‘बाप बाप होता है.. झुंड मे तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है’, असा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे. कणकवलीतल्या बॅनरचे पडसाद रत्नागिरीत उमटल्याचे दिसत आहे. कोकणात महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष या पोस्टरच्या माध्यमातुन पाहायला मिळत आहे.याअगोदर कणकवली गावात ‘वक्त आने दो, जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ अशा आशयाचे बॅनर लागले होते. या बॅनरवर किरण सामंत आणि उदय सामंत यांचा फोटो होता. याच बॅनरचे पडसाद आता रत्नागिरीत पाहायला मिळाले आहेत. कोकणामध्ये आता पदवीधर निवडणूका होणार आहेत. त्याअगोदरच महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असेल, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु सध्या उदय सामंतांच्या गावात राणेंचे बॅनर लागल्यामुळे आता बॅनर युद्ध रंगणार असल्याचे चिन्ह दिसत आहेतwww.konkantoday.com