आज प्रवेश करणाऱ्यांची लिस्ट वाचत बसलो तोवर एकनाथ शिंदे साहेब लँड होतील…उद्योग मंत्री उदय सामंत


उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरीत आभार सभा होणार आहे.एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु असून उद्धव ठाकरेंना धक्क्यांमागून धक्के बसत आहेत.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीमध्ये आभार सभा पार पडणार आहे. रत्नागिरीमधील चंपक मैदानात अडीच्या सुमारास ही सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्यात मोठे पक्षप्रवेश होणार असून त्याची यादीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वाचून दाखवली.

माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार कदम, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना महाडिक आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.आज प्रवेश करणाऱ्यांची लिस्ट वाचत बसलो तोवर एकनाथ शिंदे साहेब लँड होतील… 150 हुन अधिक प्रमुख पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून आमच्याकडे येतील. पराभवानंतर अनेक नेत्यांनी आपलं काय चुकलं याचा आत्मचिंतन केले. लोक का जात आहेत याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असंही उदय सामंत म्हणाले.

दरम्यान, आजच्या पक्षप्रवेशामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावंत शिलेदार भास्कर जाधव यांच्या भावाचाही समावेश आहे. आमदार भास्कर जाधव यांचे चुलत बंधु, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळशेठ जाधव आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button