
खेड रेल्वेस्थानकात रेल्वे सुशोभिकरणावर पुन्हा एकदा खर्च.
खेड रेल्वेस्थानक परिसरातील सुशोभिकरणावर कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा करुन नवा साज देण्यात आला. मात्र मुसळधार पावसात दर्जाहीन कामाची पोलखोल झाली आहे. सर्वत्र लागलेल्या गळतीमुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. याबाबत टीकेची झोड उठल्यानंतर गळती. थोपवण्यासाठी सुशोभिकरणातील कामावर पुन्हा मलमपट्टीचा ’उतारा’ देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. स्थानक परिसरातील सुशोभिकरण व रस्ता कॉंक्रिटीकरणावर ९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.
एकीकडे तब्बल २९ वर्षांनी रेल्वेस्थानकाचे रुपडे पालटल्याचा डांगोरा पिटण्यात आला. दुसरीकडे मात्र सुशोभिकरणाच्या दर्जाहीन कामामुळे गतवर्षी ऑक्टोबर महिन्यातच गळती सुरु झाल्याने सार्वजनिक बांधकाम खाते टीकेचे धनी बनले. आठवडाभर पावसाने धुमाकूळ घातला असता पावसाचे पाणी रेल्वेस्थानक परिसरात झिरपून सर्वत्र दलदल निर्माण झाली होती. आधीच सुशोभिकरणातील काम अपूर्णावस्थेत होते. त्यात गळतीची भर पडल्याने हे काम चर्चेचा विषय बनले आहे.www.konkantoday.com