
दुबईतील श्रीमानयोगी सेवा परिवाराने राजापूर तालुक्यातील ५५ कुटुंबांना भाजीपाल्याचा खर्च दिला
कोरोनाप्रतिबंधाच्या सध्या संचारबंदीच्या काळात अनेक कुटुंबांची होणारी परवड लक्षात घेता त्यांना मदतीचा हात देता यावा, या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्थेच्या राजापूर शाखेने मदतीचे आवाहन केले होते. सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तिमत्त्वांनी मदत करावे, असे सूचित करण्यात आले होते. त्याला अनेक संस्थांनी अनुकूल प्रतिसाद दिला. विशेष बाब म्हणजे राजापूर तालुक्यातील दुबईस्थित विजय येडगे आणि त्यांचे बंधू संजय येडगे यांच्या माध्यमातून दुबईतील श्रीमानयोगी सेवा परिवाराने राजापूर तालुक्यातील ५५ कुटुंबांना भाजीपाल्याचा खर्च दिलात्याचे वाटप राजापूर तालुक्यातील पेंडखळे शिंदेवाडी, खिणगिणी धनगरवाडी, खिणगिणी झोरेवाडी, धोपेश्वर तिठवली, आंब्याचे पाणी या ठिकाणी करण्यात आले.
www.konkantoday.com