
रत्नागिरीत भाजपाला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे-निलेश राणे
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मी थांबू शकलो असतो पण माझ्या कार्यकर्त्यांनी ते होऊ दिल नाही. माझ्या या संघर्षाच्या प्रवासात त्यांच्यामुळेच मी या पदापर्यंत पोहोचलो आहे. पण ही सुरुवात आहे. खरा प्रवास आता सुरु झाला आहे. रत्नागिरीत भाजपाला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवायचा आहे. यासाठीच भाजपच्या आपल्या असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन या प्रवासाला सुरुवात करूया असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केले आहे. रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने झालेल्या सत्काराला उत्तर देतानाच त्यांनी आपल्या कार्यपद्धतीचे संकेत सर्वांना यावेळी दिले आहेत.भारतीय जनता पक्षाने निलेश राणे यांच्या रूपाने रत्नागिरीला मोठे पद दिले आहे. हा आनंद रत्नागिरीतील कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांचा भव्य सत्कार करून व्यक्त केला. यावेळी भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळ माने, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. बाबा परुळेकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, मुन्ना चवंडे, प्रमोद अधटराव, यशवंत वाकडे, रवींद्र नागरेकर, राजन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com