
राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत कोणतीही नाराजी नाही -पालकमंत्री उदय सामंत.
शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत आणि आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांच्या उपस्थितीत आज ठाण्यातील टेंभी नाका येथे माजी आमदार राजन साळवी यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी राजनजी साळवी यांनी धनुष्यबाण हातात घेऊन शिवसेनेच्या बळकटीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला.
मागच्या साडेतीन वर्षांत जो धनुष्यबाण शिवसैनिकांच्या हातात नव्हता, तो काही लोकांनी काँग्रेसच्या खांद्याला टेकवण्याचे काम केले. मात्र, एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण शिवसैनिकांकडे कायम ठेवण्याचे पवित्र कार्य केले.ही शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी खरी शिवसेना आहे.
ज्या ठिकाणी मा. शिंदे साहेब आणि शिवसेनेची ताकद वाढणार असेल, तिथे आम्ही पूर्ण सहकार्य करणार असल्याचं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत कोणतीही नाराजी नसून, आम्ही त्यांचे शिवसेनेत मनःपूर्वक स्वागत करीत आहोत, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी जाहीर केले.