
राजन साळवी यांच्यावर संजय राऊत भडकले खालच्या पातळीवर टीका.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी राजन साळवी यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली आहे.राजन साळवींसारख्या लोकांना मी गां**** म्हणतो.
संकटकाळात नेते आणि पक्षासोबत राहिले पाहिजे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.संजय राऊत म्हणाले, “राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यामुळे कोकणातील आमची ताकद कमी झाली, असे कोण म्हणाले? राजन साळवींनी पक्ष बदलल्यामुळे आम्हाला वाईट वाटले. पक्षाने त्यांना तीनवेळा आमदार, नगराध्यक्ष आणि त्यांना पक्षात अनेक महत्त्वाची पदे मिळाली. पण, माणूस सत्ता गेल्यावर तडफडत राहतो, याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाही.”राजन साळवी हे स्वत:ला बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक मानत होते.
बाळासाहेब अनेक काळ सत्तेशिवाय राहिले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही सगळे सत्तेशिवाय राहिलो. आमच्या स्वप्नात नव्हते, आम्ही कधी आमदार, खासदार होऊ. सत्ता आम्हाला फार उशिरा मिळाली. सत्ता नसताना आम्ही बाळासाहेब ठाकरेंसोबत राहिले. यापुढेही राहू. सत्ता हे सर्वस्व नाही. राजन साळवींसारख्या लोकांना मी गां**** म्हणतो. संकटकाळात नेते आणि पक्षासोबत राहिले पाहिजे,” असं राऊत यांनी म्हटले.
“राजन साळवी यांची ओळख शिवसेना या चार अक्षरांमुळे आहे. तुम्हाला पक्षाने जिल्हाप्रमुख, नगराध्यक्ष आमदार केले नसते, तर कोण राजन साळवी, कोण संजय राऊत? आमच्यामागे शिवसेना ही चार अक्षरे असल्यामुळे आम्ही आहोत. हे लोक नालायक आहेत,” असा संताप राऊत यांनी साळवींवर व्यक्त केला आहे.