
राजन साळवी यांची कोणतीही ढवळाढवळ आम्ही आमच्या मतदारसंघांमध्ये होऊ देणार नाही- शिंदे सेनेचे राजापूर येथील नाराज कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या भावना.
राजन साळवी यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशामुळे कोकणात शिंदे गटाची ताकद वाढली खरी पण कोकणातील शिंदेसेना मात्र त्यांच्या येण्यामुळे नाराज झाली आहे. माजी आमदार राजन साळवींच्या पक्षप्रवेशानंतर राजापूर लांजा मतदारसंघांत पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशनानंतर राजापूर लांजासारख्या मतदारसंघातील शिंदेसेनेतील कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. राजापूर लांजासारख्या मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत आहेत. या पदाधिकाऱ्यांनी थेट इशाराच दिला आहे.नाराज शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर तीव्र नाराजी व्यक्त करतनाराज शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, ‘राजन साळवी यांचे भूत आमच्या डोक्यावर नको.
शिंदेसाहेबांनी आमच्यावर हे हे मढ लादू नये आणि जर का प्रवेश झालेला आहे तर राजन साळवी यांची कोणतीही ढवळाढवळ आम्ही आमच्या मतदारसंघांमध्ये होऊ देणार नाही.’तसंच, ‘त्याचबरोबर त्यांना विकास करायचा असेल तर तो अन्य कुठेही करावा. परंतु आमच्या मतदारसंघात मागील १५ वर्षांत काय विकास केला तो दिसून आलेला आहे. ज्यांना मतदाराने नाकारलेला आहे अशा आमदाराला पुन्हा आमच्या डोक्यावर बसवू नये. त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही कोणतेही संबंध तसेच आम्ही कार्य करणार नाही.’, असे मत नाराज शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.