
पक्षासाठी कोरड्या विहिरीत उडी मारण्याची तयारी-वैभव खेडेकर
* राज ठाकरे यांचे आदेश आहेत. पक्षासाठी कोरड्या विहिरीत उडी मारण्याची तयारी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात जो संघर्ष केला, त्याची फळे यायची वेळ आली आहे.त्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मी चालणार आहे, असे मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर वैभव खेडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. मात्र, राज ठाकरेंच्या भेटीनंतर वैभव खेडेकर यांनी महायुतीच्या प्रचारात सक्रीय सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.पत्रकारांशी बोलताना वैभव खेडेकर म्हणाले की, या राजकारणात कुणी कुणाचा दोस्त नसतो आणि कुणी कुणााचा दुश्मन नसतो. त्यामुळे भविष्यात या सगळ्या गोष्टी जुळून येतील, असा मला विश्वास आहे. आता आमची महायुती झालेली आहे. रामदास कदम महायुतीचे नेते आहेत. महायुतीचे वातावरण चांगले आहे. त्यामुळे यामध्ये मिठाचा खडा होऊ इच्छित नाही. ते काही बोलले असतील, त्याची दखल राज ठाकरे यांनी घेतलेली आहे, असे वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे. www.konkantoday.com