
फुणगूस खाडीपट्ट्यातून हापूस पेटी पुणे बाजारात
कोकणात अनेक ठिकाणी लहान कैरीसुद्धा दिसत नाही; परंतु संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस खाडीपट्ट्यातील परचुरी येथील बागायतदार शरद गोणबरे, विपुल गोणबरे यांनी आपल्या बागेतील तयार हापूस आंब्यांची चार डझनांची पेटी पुणे येथे लक्ष्मीनारायण यांच्याकडे पाठवली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात हापूसच्या पेट्या मोठ्या प्रमाणात मुंबई बाजारात रवाना झालेल्या होत्या; मात्र यावर्षी चार ते पाच बागायतदारांनी हापूस बाजारात पाठवण्याचा मुहूर्त साधला आहे. तेही पावस, चांदेराई, रिळ येथून काही पेट्या मुंबई आणि पुणे बाजारात विक्रीसाठी गेल्या होत्या.