
फणसोपमध्ये 11 पैकी 4 जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बिनविरोध जिंकल्या
रत्नागिरी : तालुक्यातील फणसोप ग्रामपंचयतीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. सदस्यपदाच्या 11 आणि थेट सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली आहे. उप तालुका प्रमुख राकेश साळवी यांच्या नेतृत्वाखाली 11 पैकी 4 जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बिनविरोध जिंकल्या आहेत तर 2 जागा जमाती मार्फत बिनविरोध करण्यात आल्या आहेत. थेट सरपंचपदासाठी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राधिका साळवी रिंगणात आहेत.