
नेवरे येथे गजानन महाराज प्रकटदिन उत्सव सोहळा. रविवारपासून मंदिरात विविध कार्यक्रम.
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने रविवार दि. १६ ते गुरूवार दि. २० फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले आहेत.
रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी मंदिरात पहाटे काकड आरती, सकाळी ७.३० वाजता पंचामृती पूजा व अभिषेक, सकाळी ९ वाजता श्री गणेश याग, दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, रात्री १०.३० वाजता लावगणवाडीतील श्री गजानन महाराज नमन मंडळातर्फे बहुरंगी नमन सादर करण्यात येणार आहे.
सोमवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रींची पूजा, सकाळी ७.३० वाजता पालखी मिरवणूक दुपारी १२ वाजता नैवेद्य, सायंकाळी ७ वाजता श्रींची पालखी मुक्काम, रात्री १० वाजता भजन होणार आहे.
मंगळवार दि. १८ रोजी सकाळी ७ वाजता श्रींची पूजा, सकाळी ७.३० वाजता श्रींची पालखी मिरवणूक, दुपारी १२. ३० वाजता नैवेद्य, सायंकाळी ७ वाजता पालखी मंदिरात येईल. सायंकाळी ७.३० वाजता श्रींची आरती व प्रसाद, रात्री ९ वाजता हरीपाठ होणार आहे.
बुधवार दि. १९ रोजी सकाळी पंचामृती पूजा व अभिषेक, सकाळी ८.३० वाजता श्रीराम, सीता, श्री विठ्ठल रखुमाई, श्री हनुमान मूर्ती वर्धापन दि, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता ह. भ. प. प्रसन्न जोशी यांचे कीर्तन व राळी ९ वाजता भजन होणार आहे.
गुरूवार दि. २० फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजता ‘श्री गजानन विजय ग्रंथ’ पारायणास सुरूवात होणार आहे. पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ७.३० वाजता महाअभिषेक व पूजा, सकाळी १०.३० वाजता प्रा. सु. ग. शेवडे प्रवचन सादर करणार आहेत. दुपारी १२ वाजता श्रींची आरती व नैवेद्य, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, दुपारी १२.३० कोतवडे येथील विजय मयेकर भजन सादर करणार आहेत. रात्री १०.३० वाजता आबिटगाव-दत्तवाडी येथील नवविकास नमन मंडळातर्फे बहुरंगी नमन सादर करण्यात येणार आहे.