
सर्वंकषचा विद्यार्थी सिद्धांत सुर्यगंध पोहचला युरोपमध्ये
इंडो लॅटवियन स्टुडंट एक्सेंज प्रोग्राम मधून मिळाली संधीतालुक्यातील सर्वंकष विद्या मंदिर रत्नागिरी येथील इयत्ता ७ वी इयत्तेत शिकणारा विद्यार्थी सिद्धांत सुर्यगंध हा इंडो लॅटवियन स्टुडंट एक्सेंज प्रोग्राम मधून युरोप मधील लॅटविया देशामधे शिक्षणासाठी रवाना झाला आहे. यासंदर्भात अधिक वृत्त असे की ,रिगा या लॅटवियाच्या राजधानीतील “रिगा ओस्टवाल्ड विदुस्कुला” या तेथील शासकीय शाळेमध्ये तो ३ महिने शालेय शिक्षणासोबत देशाच्या सांस्कृतिक देवाण – घेवाणीतही भाग घेणार आहे. रीगामधील प्रतिष्ठित वादिम पावलोव्स यांच्या सहकार्याने ‘सर्वंकष’ चे संस्थापक अर्जुन गद्रे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अशी संधी उपलब्ध करीत शिक्षणाची परदेशातीलही द्वारे खुली करुन ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
तसेच प्राचार्या मोनिका जेसवाल , वर्गशिक्षिका रुता भिडे, शिक्षक श्री.जॅरेड यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले . सिद्धांत सूर्यगंध हा उत्तम रायफल शुटर सुद्धा आहे . सिद्धांत तसेच डॉ . सूर्यगंध यांच्या कुटुंबियांच्या हितचिंतकांकडून सिद्धांतवर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.