
आंबडवे गावातील जेट्टी आणि रस्त्याच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा**झाल्याचा आरोप
_भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेले रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या ठिकाणी केंद्र शासनामार्फत सागरमाला योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार सुरू असून याबाबत तत्काळ सखोल चौकशीची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब जगधने यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. हे काम केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत असून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत हे काम सुरू आहे. मंडणगड तालुक्यातील गाव अंबडवे या ठिकाणी जेट्टी पोच रस्ता या कामाला २०१८ मध्ये मंजुरी मिळालेली आहे. याबाबतची वर्कऑर्डर २१ सप्टेंबर २०१८ ला दिली गेली आहे. तसेच काम सुरू करण्याबाबतचे महत्वाचे म्हणजे हे काम १८ महिन्याच्या मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक असताना अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. या कामासाठी सात कोटी ४५ लाख २२५२५ रक्कम असून सात कोटी ९७ लाख ११ हजार एकोणीस रुपये सर्व करांसह मंजूर आहेत. काम अपूर्ण असताना ठेकेदाराला मात्र चार बिले अदा करण्यात आली आहेत. म्हणजेच एकूण चार बिलापोटी तीन कोटी ५७ लाख १८० रुपये ठेकेदाराला अदा केलेले आहेत. www.konkantoday.com