
नवीन महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सरहद, पुणे आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
जीवन तळेगावकर यांनी संपादित केलेल्या “उजेडाचे प्रवासी” या कवितासंग्रहाचे प्रकाशन व दिल्लीमधील सन्माननीय मराठी जनांच्या सन्मान सोहळ्यास महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली.यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते “उजेडाचे प्रवासी” या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, डॉ. सच्चिदानंद जोशी, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, मा. संजय नहार यांसह मोठ्या संख्येने साहित्यिक आणि मान्यवर उपस्थित होते.