दापोली तालुक्यातील नवशी येथे जिल्हास्तरीय जाखडी नृत्य स्पर्धेत भोलेनाथ कलापथक प्रथम.

दापोली तालुक्यातील नवशी येथे गलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबईच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय जाखडीनृत्य स्पर्धेत खेड-साखळोली येथील शाहीर महेश मुकनाक यांच्या भोलेनाथ नृत्य कलापथकाने प्रथम क्रमांक पटकावला.यामध्ये दापोली-किन्हळ येथील शाहीर पप्या जोशी यांच्या राधाकृष्ण नृत्य कला पथकाने द्वितीय, तर शाहीर अजित गोवले यांच्या ओमसाई नृत्य कला पथकाने तृतीय क्रमांक पटकावला.

अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष तांबे होते. सरचिटणीस संतोष धारसे यांनी प्रास्ताविक केले. तर उत्कृष्ट ढोलकीपटू म्हणून वणंद येथील हेमंत दुबळे, उत्कृष्ट गायक कुंभवे येथील खेमेश्‍वर नृत्य कला पथकाचे रमाकांत हुमणे यांना व उर्वरित तीन नाच मंडळांना सहभाग घेतल्याबद्दल ढोलकी, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. या कार्यक्रमात देणगीदारांसह युवा शाहीरांचा सत्कार करण्यात आला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button