
जामनगर एक्सप्रेसमधून रेल्वे प्रवाशाचा १ लाख किंमतीचा लॅपटॉप चोरीस.
रेल्वे प्रवासात १ लाख रुपये किंमतीचा लॅपटॅप चोरीस गेल्याची घटना चिपळूण रेल्वेस्थानकात काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. या प्रकरणी सोमवारी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अलिना लालू (२३, केरळ) यांनी दिली. अलिना लालू जामनगर, तिरूनवेली एक्सप्रेस या रेल्वेगाडीतून प्रवास करत होती. ती बसलेल्या आसनावर ठेवलेली लॅपटॉपची बॅग चोरट्याने चोरून नेली. हा प्रकार अलिनाच्या लक्षात आल्यानंतर तिने दिलेल्या फिर्यादीनुसार चिपळूण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com