
कुष्ठ रोगाचे निर्मूलन होण्यासाठी विद्यार्थ्यांसह सर्व थरातील नागरिकांनी प्रयत्नकेले पाहिजेत …. डॉ परशुराम निवेंडकर
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड उपकेंद्र कळझोन्डी अंतर्गत पूर्ण प्राथमिक शाळा भगवतीनगर निवेडी येथे स्पर्श अंतर्गत कुष्ठरोग अभियान मोहीम राबविली जात आहे त्या निमित्ताने या शाळेत निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या त्या स्पर्धेच्या निमित्ताने आरोग्य केंद्राचे आरोग्य निरीक्षक डॉ परशुराम निवेंडकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. लवकर निदान व योग्य उपचार करून विकृती शिवाय सांसर्गिक प्रकारचा रुग्ण बरा होतो. तसेच कुष्ठ रुगणाबद्दलचे गैरसमज दूरकरून त्यांना समाजात इतर नागरिकांप्रमाणे राहण्याचा बोलण्याचा व वावरण्याचा अधिकार आहे.
फक्त त्यांनी तात्काळ उपचारखाली येणं आवश्यक आहे. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्याने विकृती आणि रुग्णतील विद्रूपता टाळता येऊ शकते असे डॉ निवेंडकर यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले मुलांनी ही आपल्या घरी आजूबाजूला शेजारी पाजारी तसेच नातेवाईकांपैकी कोणी असे सौंशयित असतील त्यांची माहिती संबंधित आरोग्य कर्मचारी आशा सेविका किंवा शिक्षक यांना द्यावी असे आवाहन केले. या वेळी मुख्यध्यापक श्री. शिरकर, cho श्रीम. अक्षता शिर्सेकर, आरोग्य सेविका श्रीम. वीणा शिरगांवकर, श्रीम. दीपा गावडे आशा सेविका श्रीम. घाणेकर व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुरवातीला मुख्याध्यापक श्री. शिरकर सर यांनी प्रास्ताविक व उपस्थिताचे स्वागत केले