
रत्नागिरी येथील चंपक मैदानात तरुणीवर अत्याचार केल्या प्रकरणी तरुणाला अटक
रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट मुलीला रस्त्यातून घरी जात असताना दुचाकीवर जबरदस्तीने बसवून तीला चंपक मैदान येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका तरूणाविरोधात शहर पोलिसांनी अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सदर तरुणी एका रुग्णालयात रिसेप्शनीस्टचे काम करते.ती ड्युटी संपवून रात्री आठ वजता आपल्या घरी जात असताना पटवर्धन वाडीच्या जवळ बाइकवरून आलेल्या तरुणानेतीला जबरदस्तीने दुचाकीवर बसण्यास भाग पाडले व तिला चंपक मैदानात एकाकी स्थळी नेले व तिच्यावर अत्याचार केला.सदर तरुणीने कशीबशी सुटका करून घेतली व घरी आल्यानंतर तिने झालेला प्रकार आपल्या घरातल्यांना सांगितला. घरातल्यानी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली.सदरचा तरुण तरुणी राहत असणाऱ्या परिसरातीलच असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
www.konkantoday.com