संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे हातीस येथे रुग्ण सेवा केंद्राचे उद्घाटन.

रत्नागिरी. :- … कोकणातील सर्वात प्रख्यात अशा हातीस गावातील पीर बाबरशेख यांच्या उरुसानिमित्ताने लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात, अशावेळी काही आपत्कालीन परिस्थिती एखाद्या भाविकावर ओढवली तरी त्याला तात्काळ मदत देण्यासाठी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चा हातीस येथे रुग्ण सेवा केंद्र सुरू असतो.गेली 7 वर्षे ही सेवा विनामूल्य अखंडपणे चालू आहे .

यंदाही 12 व 13 फेब्रुवारी रोजी असे दोन दिवस ही अखंडपणे सेवा सुरू राहणार आहे,या सेवा केंद्राचा शुभारंभ बाबरशेख ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर, डॉ दिलीप नागवेकर,माजी अध्यक्ष तुषार नागवेकर, महेश कीर, नितीन शिवणकर, नरेंद्र नागवेकर आणि इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या सेवेबाबत येथील ग्रामस्थ मंडळाने संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे कौतुक करून आभार मानले.यावेळी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलफे, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे समाज सेवा अधिक्षक रेशम जाधव उपस्थित होते,यावेळी पोलीस निरीक्षक महेश तोरसकर,एस टी महामंडळ, रत्नागिरी चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते,उरुसा साठी येणाऱ्या भाविकांना जर काही मदत हवी असल्यास आमच्या हातीस दर्गा समोरील सेवा केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष शकील गवाणकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button