
राज्यातील कोरोनास्थिती पाहाता निर्बंधामध्ये सूट मिळण्याची शक्यता-उपमुख्यमंत्री अजित पवार
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनास्थिती पाहाता निर्बंधामध्ये सूट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी याचे संकेत दिले होते. त्यानुसार, विकेंड लॉकडाउन संपण्याची चिन्हे दिसत आहेत. याशिवाय ज्या शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आलेली आहे त्या शहरातील सर्व दुकानांची उघडे ठेवण्याची वेळ वाढविण्याचा विचार होऊ शकतो. यानुसार सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली जाईल. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर येत्या सोमवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
www.konkantoday.com