
माझ्यावर आजपर्यंत शरद पवार यांनी कधी गुगली टाकली नाही,-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.महाराष्ट्र सदनात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू असताना एक घटना घडली, एकनाथ शिंदे यांनी आपल्या एका कृतीनं अख्ख्या महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत.नेमंक काय घडलं? एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र सदनात या क्रार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतानं झाली.
शामिमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत गायलं. शामिमा अख्तर जेव्हा महाराष्ट्र गीत गात होत्या तेव्हा सर्वजण खालीच बसले होते. मात्र ही गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येताच ते स्वत: उभे राहिले अन् त्यांनी इतरांना देखील उभं राहिला सांगितलं.एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार देण्यात आलं, यावेळी एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला. विधानसभा निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतर देखील विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकाच मंचावर आले.
दरम्यान यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, ‘महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार सोहळा आज पार पडत आहे. दिल्लीच तख्त राखणाऱ्या महादजी शिंदे यांच्या स्मृतीला वंदन करतो. या सन्मानापेक्षा येणारी जबाबदारी मोठी आहे, शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे हे भाग्य आहे. महादजी शिंदे यांच्या या महापराक्रमी भूमीत माझा देखील जन्म झाला हे माझं भाग्य.मला पुरस्कार देणारे जरी शरद पवार असले तरी ते देशाचे क्रिकेटपटू शिंदे यांचे जावई आहेत. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांना ते गुगली टाकतात, पण माझ्यावर आजपर्यंत शरद पवार यांनी कधी गुगली टाकली नाही, टाकणार नाही असं वाटत’ असं शिंदे यांनी म्हटलं आहे.