
देवगडमध्ये मत्स्य महाविद्यालयासाठी हालचाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील नियोजित मत्स्य महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.नियोजित देवगड मत्स्य विद्यालयाबाबत कृषी मंत्री माणिक कोकाटे यांच्या मंत्रालयातील दालनात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
नियोजित देवगड येथील मत्स्य विद्यालय नागपूर विद्यापीठाला संलग्न न करता ते दापोली कृषी विद्यापीठाला संलग्न करावे अशी सूचना राणे म्हणाले, नागपूर मत्स्य विद्यापीठाकडे यासाठी लागणारा पुरेसा कर्मचारीवृंद नसल्याने अधिक भार टाकू नये. याबाबत दापोली कृषी विद्यापीठाचं ही म्हणणे ऐकून झाल्यानंतर कृषी मंत्री माणिक कोकाटे यांनी हा विषय कॅबिनेटसमोर ठेवून त्यास मान्यता घेण्यात येईल असे आश्वासित केले.देवगड येथील मत्स्य विद्यालय लवकरात लवकर कसे सुरू होईल याबाबत संबंधित सर्वच अधिकार्यांनी पाठपुरावा करावा अशी सूचनाही राणे यांनी दिली