
चिपळूण येथील नगरपरिषदेची धोकादायक जुनी इमारत लवकरच जमीनदोस्त.
चिपळूण येथील नगरपरिषदेची धोकादायक बनलेली एक इमारत लवकरच जमीनदोस्त होणार आहे. प्रशासनाकडून तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या या इमारतीचा काही भाग ढासळू लागल्याने इमारतीखाली कोणीही वाहने पार्किंग करू नये म्हणून दोर्या बांधण्यासह टायर ठेवण्यात आले आहेत.
येथील नगर परिषदेची स्थापना १ डिसेंबर १८७६ साली झाल्यानंतर १९४७-४८ साली पहिली इमारत तर १९७४ साली दुसरी इमारत बांधण्यात आली. पहिली इमारत दगडी बांधकामाची असून तिला ७७ वर्षे तर दुसर्या इमारतीला ५१ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र ही इमारत आता अखेरची घटका मोजत आहे.www.konkantoday.com