
खाजगी कंपन्यांच्या कारभारामुळे संगमेश्वर-देवरूख राज्यमार्गाची दुरवस्था.
खाजगी कंपनीतील केबल टाकताना संगमेश्वर-देवरूख राज्यमार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत आहे. मार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले असून मार्शलस्टोनचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.पावसाळ्याच्या कालावधीत संगमेश्वर-देवरूख राज्यमार्गावर अनेक अपघात घडले.
वाहनचालक, प्रवाशांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राज्यमार्गाची तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली. खाजगी कंपन्यांनी इंटरनेटच्या केबल टाकण्यासाठी संगमेश्वर-देवरूख राज्यमार्गावर अनधिकृतपणे खोदाई सुरू केली आहे.www.konkantoday.com