
कुवारबाव परिसरात सतत दोन तीन दिवस पाणीपुरवठा नाही.
रत्नागिरी शहराजवळील असलेल्या कुवारबाव ग्रामपंचायत पाण्याच्या बाबतीत अजूनही एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून आहे. कुवारबाव परिसरात गेले दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा बंद असून त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांची अडचण झाली आहे. मात्र असे असताना कुवारबाव ग्रामपंचायत हद्दीत उद्याही पाणीपुरवठा होणार नसल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने रिक्षातून दवंडी पिटून जाहीर करण्यात येत आहे.
मात्र सतत इतके दिवस पाणीपुरवठा नसताना ग्रामपंचायतीने केवळ दवंडी पिटून पाणीपुरवठा होणार नसल्याचे सांगण्यापेक्षा टँकर किंवा अन्य मार्गाने पाणी त्या भागातील नागरिकांना पुरवणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे. कुवारबाव परिसर हा वाढता विकासाचा भाग असून पाणी नसल्यामुळे नागरिकांना उन्हाळा सुरू होण्याआधीच हैराण व्हावे लागत आहे.