
गायीने शिंग मारल्याने वृद्धा गंभीर जखमी, जिल्हा रूग्णालयात दाखल
लांजा तालुक्यातील भडे येथे गायीच्या हल्ल्यात वृद्धा गंभीर झाला. सरीता गोविंद लिंगायत (६६, रा. भडे, ता. लांजा) असे जखमीचे नाव आहे. सरीता या गुरूवारी सकाळी गोठ्यामध्ये शेण काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी गायीने त्यांना शिंग मारून दुखापत केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सरीता यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले.पोलिसांच्या माहितीनुसार सरीता या ११ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे गोठ्याची साफसफाई व शेण काढण्यासाठी गोठ्यात गेल्या होत्या. गोठ्याची साफसफाई करत असताना अचानक गारीने सरीता यांच्या पाठिमागे शिंग मारले. गंभीर दुखापत झालेल्या सरीता यांना नातेवाईकांनी उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रूग्णालयाच्या पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com