
जिल्ह्यातील १५ गावातील नद्यांमधील गाळ उपसला जाणार
जलसंपदा विभागाच्या अलोरीतील यांत्रिकी विभागातर्फे १५ गावातील नद्यांमधील गाळ उपसला जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळातर्फे यासाठी १ कोटी ४१ लाख ३६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पूरनियंत्रणासाठी रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळातर्फे हा निधी मंजूर करण्यात आला. आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम यांच्या उपस्थितीत तालुक्यातील पोफळी येथील वाशिष्ठी नदीतून गाळ उपसाच्या कामाला सुरूवात झाली असून लवकरच पंधरा गावातील नद्या मोकळा श्वास घेणार आहेत.
www.konkantoday.com