
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी विवाहित तरुणास २० वर्षे सक्तमजूरी.
सोशल मिडीयावर झालेल्या ओळखीतून फूस लावून नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विवाहित तरुणाला न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्तमजूरी व १६ हजार रुपयांचा दंड ठोठावला.रूपेश महादेव गुरव (वय ३१, रा. लांजा-गुरववाडी) असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विवाहित तरुणाचे नाव आहे. ही घटना १ मे २०२३ या कालवधीत सोळजाई मंदिर नजीक तामनगाव आणि एअरटेल टॉवर ता. करवीर, जिल्हा कोल्हापूर येथे घडली.
रुपेश गुरव हा विवाहित आहे. त्याची पिडीत अल्पवयीन मुलीशी सोशल मिडियावर मैत्री झाली होती. त्यानंतर रुपेश यांने अल्पवयीन मुलीला फुस लावून विशाळगड येथे फिरायला नेतो असे सांगून पालकांच्या अख्त्यारितून सोळजाई मंदिर-देवरुख येथून दुचाकीवरुन घेऊन कोल्हापूर येथे घेऊन गेला. त्यानंतर रात्री एअरटेल टॉवर-कोल्हापूर येथे मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध फुस लावून पळवुन नेणे, लैगिंक अत्याचार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपास देवरुख पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार करत होते. तपासात पोलिसांनी आरोपी रुपेश गुरव याला अटक केली.
न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. गेली दोन वर्षे तो न्यायालयीन कोठडीत होता.मंगळवारी (ता. ११) या खटल्याचा निकाल प्रमुख जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे ॲड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले. दोन्ही पक्षातर्फे झालेल्या युक्तीवादात सरकारी पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले.