
अमेरिकेत राज ठाकरे कुटुंबाचं मराठमोळं स्वागत
अमेरिकेतील सान होजे इथं बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने अधिवेशन घेण्यात येत आहे. या अधिवेशनाला जगभरातील मराठी बांधव एकत्रित येणार आहेत. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील कुटुंबासह अमेरिकेत पोहचले.त्याठिकाणी ठाकरे कुटुंबाचं मराठमोळं स्वागत करण्यात आले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.सान होजे येथील मेरियट हॉटेलमध्ये राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी, मुलगा अमित, सून मिताली आणि नातू कियान ठाकरे पोहचले. त्यावेळी संमेलनाचे मुख्य संयोजक प्रकाश भालेराव आणि सुजाता भालेराव यांनी राज ठाकरे-शर्मिला ठाकरे यांचे औक्षण करत मराठमोळं स्वागत केले. तर बृन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दीक्षित यांनी मंत्रोच्चाराने त्यांचे स्वागत करताना व्हिडिओत पाहायला मिळते. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी सगळेच सदस्य खूप उत्सुक होते. त्याचसोबत हॉटेलमधील इतर लोकही मराठमोळ्या पद्धतीचं स्वागत पाहून भारावून गेले.www.konkantoday.com